तनिष्कने केलेली जाहिरात आणि त्यावर आलेल्या प्रक्रिया ह्यावरून एक बाब सहसा चटकन कुणाच्या लक्षात येईल असं नाही. ह्या लेखामध्ये तिच बाब उद्घृत करण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री. रतन टाटा हे उद्योग विश्वातलं एक झळाळणारं, लखलखीत नाव आहे ह्याबाबत कोणाचंही दूमत असण्याचं कारण नाही. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ही बाब अधोरेखित केली आहे. आपण पाहिलं तर सहसा असं कोणतही क्षेत्र नाही जेथे "टाटा समुह" कार्यरत नाही. ह्याक्षणी ते सर्व व्यापामधून निवृत्त झालेले आहेत. रूढार्थानं त्यांनी रस्ता आखून दिला आहे. आता त्यावरून समूहाला वाटचाल करायची आहे. आज टाटांना लोक त्यांच्या सचोटी, जिद्द, चिकाटीसाठी ओळखतात. त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सुप्रसिद्ध आहे तो असा की, त्यांच्या वाहन उद्योगामध्ये खाजगी प्रवासी वाहतूक श्रेणीमधील वाहनांमध्ये त्यांनी इंडिका ही सुप्रसिद्ध मोटार आणली होती. अपेक्षेप्रमाणे तीची विक्री होत नव्हती. एक वेळ अशी आली की, त्यांनी आपला तो विभाग बंद करावा का हा विचार सुरू होता. प्रसंगी फोर्ड समुहाकडे टाटा यांचा प्रवासी वाहनांचा विभाग विकत घेण्याचा प्रस्ताव गेला होता. त्याला नकारात्मक उत्तर मिळालं. शिवाय हेटाळणी झाली ती वेगळीच. पुढे अर्थात त्यांनी तो विभाग नफ्यात आणलाच शिवाय फोर्ड समुहावर जेव्हा तिच वेळ आली तेव्हा टाटांनीच फोर्डचे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे दोन विभाग विकत घेतले.
व्यवसायामध्ये नफा कमावणं हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून यशस्वी होता येतं का? तर याचं उत्तर माझ्यालेखी तरी नाही असंच आहे. ज्या समाजाच्या जीवावर आपला व्यवसाय चालतो त्याच्या ऋणातून थोड्याप्रमाणात तरी का होईना पण उतराई व्हाव लागतं नव्हे तर व्हावं असं मी म्हणेन. विवीध उद्योगसमुहांमार्फत सामाजिक दायित्वाअंतर्गत (CSR) जे उपक्रम राबवले जातात ते त्याचंच द्योतक आहे असं मी मानतो. समाजाच्या कसं आणि किती उपयोगी पडावं ह्याचं श्री. रतन टाटा हे आदर्श आणि उत्तम उदाहरण आहे.
देश संकटात असतांना केवळ याच भावनेने श्री. रतन टाटा यांनी कोव्हिडच्या कठीण प्रसंगांमध्ये सरकारला अत्यंत उदार हस्ते मदत केली. त्या कालावधीमध्ये सामान्य लोकांमध्ये टाटा समूहबद्दल असणारा आदर द्विगुणित झाला. अर्थात त्याची दुसरी बाजू अशी पाहायला मिळाली की, अनेक लोकांनी टाटा समूहांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू घेण्यास प्राधान्यत्वाचा कौल ह्या फेसबुकच्या माध्यमातून दर्शवला होता. त्याचबरोबरीनं ती बाब प्रत्यक्षात येताना आपण पहिली असेलच. याला आपण लोकांनी त्यांच्यापरीने व्यक्त केलेली कृतज्ञता असंही म्हणू शकतो.
"लव्ह जिहाद" हा कूप्रकार लोकांना आता चांगलाच परिचीत झाला आहे. त्यामूळे सदरहू लेखात त्याबाबत लिहीण्यात काहीच हशील नाही. ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत. जसं की, ह्याला बळी पडणाऱ्या हिंदू मूली आणि त्यांची उध्वस्त होणारी कुटूंब. ही जाहिरात म्हणजे या प्रकारावर मलमपट्टी करण्याचा प्रकार वाटतो. आणि कदाचित हीच बाब काही लोकांना खटकली नसेल हे कशावरून? त्यातच तनिष्कचा जाहिरात विभागाचा प्रमूख मन्सूर अली नावाचा गृहस्थ. मग ह्याने खोडसाळपणा करून अशा प्रकारच चित्रण दाखवलं नसेल कशावरून? हिंदूंमध्ये फूट पाडायचे अनेक प्रयत्न सुरू असतात. हा प्रकार त्यातलाच एक नसेल कशावरून?
प्रश्न अनेक आहेत. मतमतांतरं देखील आहेत.
पण प्रत्येक वेळी हिंदूच का असा प्रश्न ईथे उपस्थित होतो.
इती लेखनसीमा...
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥