नमस्कार मित्रांनो,
मी लिहीत असलेला हा पहिलाच
ब्लॉग.
कदाचित ह्या लेखाचं शिर्षक वाचून असं
वाटेल की, ह्या सद्गृहस्थाच्या विश्वातून कोरोनाने
मुक्काम आटोपता घेतला की काय? किंवा ईतर काही... खरं तर तसं
काहीच नाही. सुरूवातीला जगभर असलेल्या टाळेबंदीमूळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या
आहेत. माझ्यासारख्या अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. मागच्या चार/ सहा
महिन्यांनी आपणा सर्वांना खूप काही शिकवलं. अगदी सुखनैव आयुष्य जगणाऱ्या
व्यक्तींपासून ते दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्यांपर्यंतच्या अशा सर्व
स्तरांमधल्या प्रत्येकासाठी हा कसोटीचा काळ होता. गतीमान असं रोजचं अत्यंत धकाधकीचं
आयुष्य अचानक ठप्प झालं. पायाला भिंगरी लागल्यासारखी पळणारी माणसं अचानक ह्या
ईतक्या मोठ्या कालावधीसाठी घरांमध्ये कोंडली गेली. शाळा, महाविद्यालयं,
कार्यालयं बंद झाली. सकाळी चालायला, व्यायामाला,
खेळायला जाणारी आबालवृद्ध मंडळी सर्वांचाच दिनक्रम पूर्णतया बदलला.
रोज बाहेरचं खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही असं असणारी माणसं रोज घरचं अन्न खाऊ
लागली. हॉटेल्स, मदीरालयांमध्ये होणारी गर्दी बंद झाली.
चित्रपट, नाट्यगृह सगळं - सगळं बंद... एकंदरीतच आपलं ज्या
ज्या गोष्टींवाचून अडतं... असं आपल्याला वाटतं... तसं प्रत्यक्षात नसतंच ह्याची
जाणीव कोणत्या न कोणत्या स्वरूपात आपणा सर्वांना झाली.
सध्या गणपतीचा सण अगदी तोंडावर आला
आहे. पहायला गेलं तर बाजारात मरणाची (अगदी मरणाचीच) गर्दी आहे. एक व्यावसायिक
म्हणून सांगायचं तर, म्हणावा
असा व्यवसाय नाही. निसर्गाचं म्हटलं तर तो त्याच्या प्रकृतीला साजेसा वागतोय...
बेभरवशी... सध्या तर ओला दुष्काळ पडेल की काय अशी संभावना आहे. आमच्या चिपळूणमध्ये
तर किमान दोनदा पुरपरिस्थिती उद्भवली होती. एकंदरीतच साऱ्या परिस्थितीचा विचार
केला तर ह्या कोरोनाच्या महामारीच्या कहरामूळे अत्यंत निराशाजनक वातावरण झालं आहे.
तज्ञ मंडळींच्या मताप्रमाणे अपवाद वगळता, हा काही जिवघेणा
आजार नाही. पण एकंदरच सर्वत्र प्रसारमाध्यमांमधून जे निराशाजनक वातावरण तयार
करण्यात आलं आहे त्यामूळे, दूर्दैवाने ज्यांना कोरोनाची
लागणं झाली आहे असे लोक, मोठ्या शहरांमध्ये रूग्णांची परवड
होत असल्याच्या ज्या बातम्या ब्रेकींग न्यूज च्या नावाखाली सतत दाखवल्या जातात,
त्याने प्रचंड प्रमाणात घाबरून जात आहेत. माझ्या ओळखीमधल्या काही
व्यक्तींना दुर्दैवानं कोरोनाची लागण झाली. परंतू त्यांच्या मृत्युचं कारण हे
कोरोना नसून, हृदयक्रिया बंद पडणं आदी अनेक कारणं आहेत. ह्या
सर्वातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मानसिक बळाची आत्यंतिक गरज आहे. आपल्या
माहितीमधील कोणी कोरोनामूळे आजारी पडलं तर, अशा कुटूंबाला
जवळपास वाळीतच टाकण्यासारखे प्रकार होतात ते बंद व्हायला हवं. मा. पंतप्रधानांनी
सुरक्षित अंतर ठेवून वावरण्याचं केलेलं आवाहन गांभिर्याने घेण्याची गरज आहे.
आजाराची लागण झाली की रूग्ण दगावणारंच आहे असं नसून, आपल्या
जवळचे तज्ञ डॉक्टर / आयुर्वेदिक वैद्य ह्यांच्याकडच्या उपचारांनी तो रूग्ण बरा
होतो हा विश्वास त्याला देणं आवश्यक आहे. ह्या निमीत्ताने शोले चित्रपटातला एका
पात्राच्या तोंडी असलेला एक संवाद ह्या बाबतीत अत्यंत समर्पक आहे. तो संवाद असा
आहे की, जो डर गया... समझो मर गया.
अजूनही परिस्थितीमध्ये आश्वासक
सुधारणा नाही. तरी त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी म्हणजे, बहुतेक देशांमध्ये ह्या आजारावर इलाज
म्हणून शोधली जात असलेली लस संशोधनाच्या अंतिम टप्यात आहे. आता काय झालंय
ह्यापेक्षा कोरोनाकाळापश्चात आपण आपलं आयुष्य कसं मार्गी लावू शकू ह्यावर विचार
होणं आवश्यक आहे. आचार-विचारांमध्ये सकारात्मकता अंगीकारली तर, आपलं पुढंच आयुष्य आनंदामध्ये व्यतीत होऊ शकेल.
सरतेशेवटी जनतेच्या सोयीसाठी आपल्या
घरादाराची पर्वा न करता, राबणाऱ्या
आरोग्य यंत्रणा, पोलिस कर्मचारी, विवीध
सामाजिक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य
कार्यकर्ते ह्या सर्वांचे आभार व्यक्त न करता आपण करीत असलेल्या कार्याच्या ऋणात
राहणं मी योग्य समजेन.
इति लेखनसीमा.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
Khup chan Lekh lihilays..Bhayan Vastav
ReplyDeleteभयाण वास्तव... खरं आहे.
Delete👍👍👍👍👍👍👍
ReplyDelete🙏🙏🙏
DeleteWah mast re..keep writing 👌👌👍👍
ReplyDeleteधन्यवाद स्वप्नील.
DeleteChangla Lekh Lihilyas, coronamule aleli kathin paristhiti mansacha kartepana kiti apurna ahe he dakhavate....hyavar Shrimaharajancha ek Bodhvachan Athavat te thodkyat Mahnje.....
ReplyDeleteआजचा काळ शरणागतीला उत्तम आहे. कारण विद्वत्तेला किंमत नाही. व्यक्तीचे सामर्थ्य राहिले नाही. कोठलीच शक्ती कामाला येत नाही. म्हणून शिल्लक राहिली शरणागती. ती फार सोपी आहे. पण ज्याला जगाची हाव मोठी त्याला कठीण आहे. ज्याला पोटापुरतेच पाहिजे त्याला कमीच नाही. ''मी शरणागतीने जाईन व शेवटी भगवंत म्हणूनच बाहेर येईन." अशी भावना ठेवावी.
खरं आहे.
Delete